महाराष्ट्राचे राजकीय संकट एकनाथ शिंदे LIVE:
दरम्यान, गुवाहाटी येथील रॅडिसन हॉटेलमधून सध्या राज्यात राजकीय सत्ताबदलाचा डाव रचणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद वाढत असल्याचे दिसून येत आहे. मंत्री शिंदे यांच्या गटात आमदार सामील होत असतानाच आता शिवसेनेचे अन्य बडे नेतेही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. राज्यातील काही माजी आमदारांना गुवाहाटी येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या या बड्या नेत्यांची प्रमुख मागणी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची आहे. राष्ट्रवादीमुळे ग्रामीण भागातील शिवसेनेची ताकद कमी होत असल्याचेही या नेत्यांचे म्हणणे आहे.