Loading...
उद्धव ठाकरे यांनी केवळ माझ्यामुळे माझे विरोधक राणा जगजितसिंह पाटील यांना शिवसेना पक्षात घेतले नाही. विधानसभा निवडणुकीत उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळी राणा पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याची तयारी दर्शवली. मात्र, माझी धडपड पाहून त्यांनी राणा पाटील यांना तिकीट नाकारले, असे खासदार निंबाळकर म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- ‘तू माझ्या मनात बसलास…’, असे म्हणत त्याने लाच स्वीकारली
उद्धव ठाकरेंनी मला खूप प्रेम आणि शक्ती दिली. त्यामुळे अशा व्यक्तीला संकटाच्या वेळी सोडून जाणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचा एकही खासदार पक्ष सोडणार नाही, असेही ते म्हणाले. आम्ही शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे शिवसेनेचा एकही खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार नाही, हे मला माहीत आहे, असे खासदार निंबाळकर म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेच्या आमदाराला निष्ठेचे फळ मिळाले, ही उद्धव ठाकरेंनी दिलेली मोठी भेट आहे
क्लिक करा आणि वाचा- बिक्कड शूटिंग प्रकरणी नवी माहिती, पवनचक्कीच्या निविदेवर संशयाची सुई